तेलंगणात फटाक्याच्या गोदामाला आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 18:21 IST2018-07-04T18:18:16+5:302018-07-04T18:21:24+5:30
तेलंगणामधील वारंगल जिल्ह्यातील एका फटाक्याच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे.

तेलंगणात फटाक्याच्या गोदामाला आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू
हैदराबाद - तेलंगणामधील वारंगल जिल्ह्यातील एका फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
#SpotVisuals: 10 people dead in fire at a firecracker godown near Koti Lingala Temple, 4 fire tenders present at the spot: Collector, Warangal District pic.twitter.com/Oj5rYsJtoO
— ANI (@ANI) July 4, 2018
वारंगलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या आगीचा फटका हा त्या परिसरातील घरांना देखील बसला आहे. या फटाक्याच्या गोदामात एकूण 25 कामगार काम करत होते. मात्र आग लागली त्यावेळी जवळपास 15 ते 20 जण गोदामात उपस्थित होती. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.