शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

आता 100 पेड किंवा मोफत टीव्ही चॅनल्ससाठी मोजावे लागणार प्रतिमहिना 153 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 1:35 PM

टीव्ही पाहणाऱ्यांचा पुढील महिन्यापासून खर्च काहीसा कमी होणार आहे.

नवी दिल्ली- टीव्ही पाहणाऱ्यांचा पुढील महिन्यापासून खर्च काहीसा कमी होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया(TRAI)च्या आदेशामुळे आता प्रेक्षकांना 153 रुपये(जीएसटी सहित) प्रति महिन्याला खर्च करून 100 पेड चॅनल्स आणि इतर मोफत चॅनल्स पाहता येणार आहेत. TRAIनं ग्राहकांना 31 जानेवारीपूर्वीच संबंधित 100 चॅनल्स निवडण्यास सांगितलं असून, नवी यंत्रणा 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. ग्राहकांना मोबाईलवर एसएमएस पाठवून याची माहिती दिली जातेय. TRAIनं जारी केलेल्या दोन टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडीच्या माध्यमातूनही आपल्याला यासंदर्भात माहिती मिळू शकते. TRAIच्या माहितीनुसार, बेसिक पॅकमध्ये HD चॅनल्सचा समावेश नाही. एखादा HD चॅनल्स हा दोन SD चॅनल्सच्या किमतीच्या बरोबरीचा असेल. या नंबरवर करा कॉलग्राहक 011-23237922 (ए.के. भारद्वाज) आणि 011-23220209 (अरविंद कुमार) या नंबरवर कॉल करून किंवा advbcs-2@trai.gov.in या arvind@gove.in या ईमेल आयडीवर मेल करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. चॅनल्ससाठी मोजावे लागणार 0-19 रुपये दुसरीकडे TRAIने सर्व केबल आणि DTH ऑपरेटर्सना 1 फेब्रुवारीपासून नवी सिस्टीम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना जे चॅनल्स पाहायचे आहेत, त्या चॅनल्ससाठीच फक्त पैसे मोजावे लागणार आहेत. एका चॅनल्ससाठी 0 ते जास्तीत जास्त 19 रुपये मोजावे लागणार आहेत. चॅनल्स वेगवेगळ्या स्वरूपातही आपण निवडू शकता. नवी यंत्रणा सुरुवातीला 29 डिसेंबर 2018 रोजी लागू होणार होती. परंतु त्यांनी डेडलाइन वाढवून 1 फेब्रुवारी 2019 करण्यात आली आहे. 

समजून घ्या गणित 

  • केबल ऑपरेटर सरासरी 200 रुपये आकारतात. यामध्ये ते 350 टीव्ही चॅनेल्स दाखविण्याचा दावा करतात. मात्र, यापैकी आपल्या घरामध्ये 10 ते 15 चॅनेलच पाहिले जातात. तसेच डीटीएच ऑपरेटरचे आहे. त्यांनी ठरवलेले पॅकेज असे असते की त्यामध्ये पसंतीचे सर्व चॅनेल मिळत नाहीत. यामुळे त्या चॅनलसाठी नवीन अॅड ऑन चॅनल किंवा पॅक घ्यावे लागते. हा अतिरिक्त खर्च आता बंद होणार आहे. 
  • नव्या नियमांनुसार केबल किंवा डीटीएच पुरवठादारांकडून आपल्याला हवे असलेले चॅनेल निवडता येणार आहेत. सध्या एखादा स्पोर्टचा चॅनेल घ्यायचा झाल्यास महिन्याला 40 ते 50 रुपये मोजावे लागतात. मात्र, हाच चॅनेल 1 ते 19 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. महत्वाचे म्हणजे यापुढे कंपन्या सांगतिल ते चॅनेल नाहीत, तर आपल्याला हवेत तेच चॅनेल घेता येणार आहेत. म्हणजेच ग्राहक राजा असणार आहे.  
  • ट्रायने चॅनेलची लिस्ट किंमतीसह दिली...

https://www.trai.gov.in/sites/default/files/PayChannels18122018_0.pdf या लिंकवर तुम्ही चॅनेलचे 2017 चे दर पाहू शकता. 

बेस पॅकची किंमत 

यामध्ये दूरदर्शनचे 27 फ्री-टू एअर चॅनल असणार आहे. शिवाय अन्य श्रेणींमधील प्रत्येकी 5 चॅनल असतील. 130 रुपयांमध्ये 100 चॅनल आणि त्यावर 18 टक्के जीएसटी जमा केल्यास 154 रुपये मोजावे लागतील. या चॅनलमध्ये कदाचित तुम्हाला हवे असलेले मराठी, हिंदी, इंग्रजी सिनेमा, बातम्या, मालिकांचे चॅनेलही असतील. नसल्यास 1 रुपये ते 19 रुपये मोजून ते चॅनल अॅड करावे लागतील. किंवा एखाद्या चॅनेल कंपनीचे पॅकेज हवे असल्यास तेही कमी किंमतीत घेता येईल.

आता आणि नंतरचे शुल्ककार्टून चॅनल पोगो पाहण्यासाठी सध्या 25 ते 30 रुपये महिना मोजावे लागतात. नवीन टेरिफमध्ये 4.25 रुपये असतील. स्टार स्पोर्ट चॅनलसाठी 60 ते 75 रुपये मोजावे लागतात. नवीन टेरिफमध्ये 19 रुपये मोजावे लागतील. 

29 डिसेंबरनंतर काय? चॅनेल न निवडल्यास DTH सेवा बंद होणार? 

एचडी पाहणाऱ्यांसाठीही आहे खासएचडी चॅनेल पाहणाऱ्यांनाही हा निर्णय फायद्याचा आहे. एचडी चॅनेलचे पॅकेज 175 ते 200 रुपये आहे. मात्र, एचडी सोबत तेच चॅनेल साध्या व्हर्जनमध्येही दिसतात. यामुळे एचडी वापरणाऱ्यांना विनाकारण साध्या चॅनलचेही पैसे आकारले जातात. सहाजिकच आहे, एचडी पॅकेज घेणारे एचडी चॅनेलच पाहणार. त्यामुळे हा अतिरिक्त भारही कमी होणार आहे. 

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनDTHडीटीएच