कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:09 IST2025-10-20T19:08:38+5:302025-10-20T19:09:15+5:30
Karnataka CM Siddaramaiah News: कर्नाटकमधील कन्नड जिल्ल्यात दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर उसळलेल्या गर्दीमुळे १० जण आजारी पडले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाला लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे तेथे आयोजकांनी केलेल्या व्यवस्थेचा बोजवारा उडाला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
कर्नाटकमधील कन्नड जिल्ल्यात दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर उसळलेल्या गर्दीमुळे १० जण आजारी पडले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाला लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे तेथे आयोजकांनी केलेल्या व्यवस्थेचा बोजवारा उडाला. त्यामुळे पुरेसा ऑक्सिजन आणि पिण्यास पाणी न मिळाल्याने उपस्थितांना हायपोग्लाइसीमिया आणि डिहायड्रेशनचा त्रास झाला. त्यापैकी ३ महिलांना आयव्ही फ्लूइज देण्यात आलं. तर ३ महिलांना ओपीडीमध्ये उपचार केल्यानंतर सोडण्यात आलं.
दिवाळीनिमित्त कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांचा हा कार्यक्रम पुत्तूर तालुक स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं नाव अशोका जनामना असं होतं. हा कार्यक्रम आयोजित करण्यात स्थानिक आमदार अशोक राय यांनी पुढाकार घेतला होता. दरम्यान, या कार्यक्रमाला लोकांची अपेक्षेहून अधिक गर्दी उसळली. तसेच त्यात आयोजकांची बेफिकीरीही दिसून आली. गर्दीमुळे पुरेसं पाणी न मिळाल्याने अनेक महिला आणि मुले आजारी पडली. त्यांना रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
अशोक राय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमात कपडे, भांडी कुंडी यांच वाटप केलं जाणार होते. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी केलं. कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेल्या स्टेडियमची क्षमता ही २० हजार लोकांची होती. मात्र त्यापेक्षा अधिक लोक इथे जमले होते. त्यामुळे चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर आजारी पडलेल्या व्यक्तींना पुत्तूर तालुक रुग्णालयात दाखल करण्यात आले.