देशात लवकरच धावणार 44 नव्या 'वंदे भारत' ट्रेन, 6 कंपन्यांनी लावली बोली, एका चिनी कंपनीचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 04:28 PM2020-07-11T16:28:34+5:302020-07-11T16:31:37+5:30

ही बोली प्रोपल्शन सिस्टम्स अथवा इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन किटच्या  खरेदीसाठी लावण्यात आली होती. यात भारत आणि चीनच्या संयुक्त व्हेंचर असलेल्या कंपन्यांनीही बोली लावली. गेल्या वर्षी सुरू झालेल्या पहिल्या ट्रेन-18वर 100 कोटी रुपये खर्च झाले होते.

1 chinese company participate in bid of 44 vande bharat trains | देशात लवकरच धावणार 44 नव्या 'वंदे भारत' ट्रेन, 6 कंपन्यांनी लावली बोली, एका चिनी कंपनीचाही समावेश

देशात लवकरच धावणार 44 नव्या 'वंदे भारत' ट्रेन, 6 कंपन्यांनी लावली बोली, एका चिनी कंपनीचाही समावेश

Next
ठळक मुद्देदेशात लवकरच नव्या 44 ट्रेन धावणार आहेत. या ट्रेन 'वंदे भारत' एक्सप्रेस नावाने ओळखल्या जातील. ही बोली प्रोपल्शन सिस्टम्स अथवा इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन किटच्या  खरेदीसाठी लावण्यात आली होती.गेल्या वर्षी सुरू झालेल्या पहिल्या ट्रेन-18वर 100 कोटी रुपये खर्च झाले होते.

नवी दिल्ली -भारतीयरेल्वेच्या (Indian Railways) महत्वकांक्षी सेमी हायस्पीड स्वदेशी ट्रेन-18 प्रोजेक्टअंतर्गत देशात लवकरच नव्या 44 ट्रेन धावणार आहेत. या ट्रेन 'वंदे भारत' एक्सप्रेस नावाने ओळखल्या जातील. या ट्रेन्स चालविण्यासंदर्भात टेंडर काढण्यात आले आहे. यासाठी जवळपास 6 कपंन्यांनी बोलीही लावली आहे. विशेष म्हणजे, यात एका चिनी कंपनीचाही समावेश आहे. सीआरआरसी कॉर्पोरेशन, असे या चिनी कंपनीचे नाव आहे.

खरे तर, सीआरआरसी पॉयनीअर इलेक्ट्रिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ही गुरुग्राम येथील कंपनी आहे. ही चीन सरकारच्या सीआरआरसी कॉर्पोरेशन लिमिटेडची जॉइंट व्हेंचर आहे. बोली लावणाऱ्यांत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, इलेक्ट्रोवेव्ज इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड, मुंबईची पावरनेटिक्स इक्विमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि हैदराबादची मेधा ग्रुपचा समावेश आहे. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

ही बोली प्रोपल्शन सिस्टम्स अथवा इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन किटच्या  खरेदीसाठी लावण्यात आली होती. यात भारत आणि चीनच्या संयुक्त व्हेंचर असलेल्या कंपन्यांनीही बोली लावली. गेल्या वर्षी सुरू झालेल्या पहिल्या ट्रेन-18वर 100 कोटी रुपये खर्च झाले होते. यापैकी 35 कोटी रुपये प्रोपल्शन सिस्टिमवर खर्च करण्यात आले होते. 

आताची निविदा 1,500 कोटी रुपयांची असेल. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगिले, की सध्याची निविदा गेल्या वर्षी 22 डिसेंबरला चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीने जारी केली होती. ही निविदा शुक्रवारी उघडली गेली. या ट्रेन्ससाठीची ही तिसरी निविदा होती. पहिली निविदा 43 ट्रेन सेट्ससाठी होती. दुसरी निविदा 37 ट्रेन प्रोपल्शन सिस्टिम्ससाठी जारी करण्यात आली आहे. मात्र, ही निरस्त करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

मोठी बातमी : 59 चिनी अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आणखी 20 अ‍ॅप्सवर टांगती तलवार; सरकार केव्हाही घालू शकतं बंदी

CoronaVirus : कोरोना व्हॅक्सीनवर एकाच दिवसात दोन 'गुड न्‍यूज'; 'या' देशाची व्हॅक्सीन फक्त एक पाऊल दूर

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

Web Title: 1 chinese company participate in bid of 44 vande bharat trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.