जिल्हा परिषदेच्या खतवड येथील शाळेच्या दुरूस्तीचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:50 IST2020-07-02T20:12:17+5:302020-07-02T22:50:22+5:30

दिंडोरी : नाशिक जिल्हा परिषदेच्या दिंडोरी तालूक्यातील खतवड प्राथमिक शाळा दुरूस्तीचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, छत कोसळल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

Zilla Parishad's repair work at Khatwad is inferior | जिल्हा परिषदेच्या खतवड येथील शाळेच्या दुरूस्तीचे काम निकृष्ट

जिल्हा परिषदेच्या खतवड येथील शाळेच्या दुरूस्तीचे काम निकृष्ट

ठळक मुद्देविद्यार्थी शाळेत पाठविणे धोक्याचे असल्याची भिती

दिंडोरी : नाशिक जिल्हा परिषदेच्या दिंडोरी तालूक्यातील खतवड प्राथमिक शाळा दुरूस्तीचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, छत कोसळल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
नाशिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या दुरु स्तीसाठी प्राथमिक शिक्षण शासनाच्या समग्र शिक्षा विभागातर्फे शाळा दुरु स्तीसाठी लाखो रु पयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यातून प्रत्येक शाळेच्या मागणी नुसार तालुक्यातील शाळांची दुरु स्तीची कामे केली जात आहे. खतवड येथील शाळेचे जुनाट झालेली कौले काढून नवीन पत्रे टाकण्यात आले आहेत. मात्र सदर काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले असून वर्गामध्ये शालेय साहित्य, बॅचेस, कपाट , टेबल खुर्च्यांचे देखील नुकसान झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेजारी असलेल्या व्यायाम शाळेचे देखील नुकसान केले असून, शालेय आवारातील मोठ्या वृक्ष तोडण्यात आले आहे.
सदर बांधकाम ठेकेदारास वारंवार सांगून देखील दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळेत विद्यार्थी येत नसेल तरी देखील झालेले निकृष्ठ दर्जाचे काम पाहून विद्यार्थी शाळेत पाठविणे धोक्याचे असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली जात आहे.
 
Web Title: Zilla Parishad's repair work at Khatwad is inferior