शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत दोघे अपक्ष शिवसेनेच्या ‘गळाला’?

By admin | Updated: March 4, 2017 00:51 IST

नाशिक : जिल्हा परिषदेत शुक्रवारी (दि. ३) अपक्ष म्हणून निवडून आलेले शंकर धनवटे यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेत एक सदस्यांचे संख्याबळ दिवसागणिक महत्त्वाचे ठरू लागले असून, शुक्रवारी (दि. ३) अपक्ष म्हणून निवडून आलेले शंकर धनवटे यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत दुसरे अपक्ष रूपांजली विनायक माळेकर यांनाही शिवसेनेने गळ घातल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षानेही या दोन्ही अपक्षांना आपल्या तंबूत ओढण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा आहे. शहरातील एका आमदाराच्या घरात या दोन्ही अपक्षांची बैठक होऊन त्यात थेट पालकमंत्र्यांशी या दोन्ही अपक्षांचे तीन-चार दिवसांपूर्वीच बोलणेही झाल्याचे समजते. दरम्यानच्या काळात दोन दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा भाजपाच्या एका आमदाराने या दोन्ही अपक्षांची भेट घेऊन त्यांना भाजपाचे सहयोगी सदस्य पद स्वीकारण्याबाबत चर्चा केल्याचे समजते. त्यातून या दोन्ही अपक्षांना पदेही कबूल करण्यात आल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात या दोन्ही अपक्षांनी निवडणुकीपर्यंत तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारल्याची चर्चा होती. त्यातच दोन्ही अपक्षांपैकी शंकर धनवटे यांनी समर्थकांचा मेळावा घेत कोणासोबत जावे, याबाबत चर्चा केल्याचे समजते. दरम्यानच्या काळात शंकर धनवटे यांच्यासोबत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यापासून जिल्हाप्रमुख सुहास कांदे, विजय करंजकर यांचीही चर्चा झाल्याचे कळते. त्यातूनच मग शंकर धनवटे यांनी शुक्रवारी (दि.३) समर्थकांचा मेळावा घेऊन शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. शिवसेनेचे संख्याबळ त्यामुळे २५ वरून २६ होण्याची चिन्हे आहेत. त्यातच हरसूल गटातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य रूपांजली विनायक माळेकर यांना शिवसेनेत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते. तूर्तास शंकर धनवटे वगळता रूपांजली माळेकर यांनी शिवसेनेचे थेट सहयोगी सदस्यपद स्वीकारण्याऐवजी ‘वेट अ‍ॅण्ड वॉचची’ भूमिका घेतल्याचे कळते. मात्र शिवसेना नेत्यांनी दोन्ही अपक्ष शिवसेनेसोबत असल्याचा दावा केला आहे. (प्रतिनिधी)