केंद्र शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 18:13 IST2019-12-30T18:13:31+5:302019-12-30T18:13:55+5:30

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

Zilla Parishad President's Cup competition in center school excited | केंद्र शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

केंद्र शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

ठळक मुद्देराजापूर केंद्रात बीट जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहाने

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद राजापूर गटाच्या सदस्य सुरेखा दराडे यांच्या हस्ते झाले. उपसरपंच काशिनाथ चव्हाण, माजी सरपंच प्रमोद बोडके, भाऊसाहेब गरु ड, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील मारवाडी, केंद्रप्रमुख निलेश जाधव, मीना वैद्य, रमेश खैरनार, संतोष मुंडे, गोरखनाथ भाबड, सुभाष वाघ, मुख्याध्यापक दीपक जाधव, मुख्याध्यापक अशोक विंचूे उपस्थित होते.
येवला पंचायत समितीचे माजी सभापती पोपट आव्हाड, खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक लक्ष्मण घुगे, सुनील मारवाडी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रस्ताविक रामकृष्ण घुगे यांनी तर बालाजी नाईकवाडे यांनी आभार मानले.
वकृत्व स्पर्धा प्रथम आदित्य खंडीजोर्ड, द्वितीय गायत्री वाबळे, तृतीय आराध्या घुगे. चित्रकला स्पर्धा प्रथम हर्षदा मिटके, द्वितीय पूर्वा पैठणकर, तृतीय, हर्षदा केर. १०० मीटर धावणे मुलींमध्ये प्रथम साक्षी सोनवणे, द्वितीय अंजली शुक्ल, तृतीय साक्षी सोनवणे. २०० मीटर धावणे मुलांमध्ये प्रथम ओम भड, द्वितीय वैभव खोकले, तृतीय युवराज परदेशी, वैयक्तिक नृत्य प्रथम वेदिका जाधव, द्वितीय स्नेहल भड, तृतीय अंजली शुक्ल. वैयक्तिक गीत गायन प्रथम विद्या मोरे, द्वितीय विद्या गायकवाड, समूह नृत्य प्रथम जिल्हा परिषद शाळा बाबुळगाव, द्वितीय जिल्हा परिषद शाळा सोमठाणजोश, समूहगीत गायन स्पर्धा प्रथम जिल्हा परिषद शाळा, भाटगाव. द्वितीय जिल्हा परिषद शाळा, खरवंडी.
मोठा गट वकृत्व स्पर्धा प्रथम सोनाली आहेर, द्वितीय सिद्धी भड, तृतीय कल्याणी अहिरे, चित्रकला प्रथम सोनाली खोकले, द्वितीय, मोहिनी भड, तृतीय कावेरी बिन्नर. २०० मीटर धावणे मुलींमध्ये प्रथम वैष्णवी सोनवणे, द्वितीय मोहिनी भड, तृतीय कावेरी बिन्नर, ४०० मीटर धावणे मुलांमध्ये प्रथम ऋ षिकेश दाने, द्वितीय पुरु षोत्तम गायकवाड, तृतीय आकाश मोर, खो खो (मुले) प्रथम आहेरवाडी, द्वितीय बदापूर, खो खो (मुली) प्रथम अहिरवाडी शाळा, जळगाव शाळा. कबड्डी (मुले) प्रथम आहेरवाडी शाळा, द्वितीय धामोडे शाळा, कबड्डी (मुली) प्रथम धुळगाव शाळा. वैयक्तिक नृत्य स्पर्धा प्रथम सेजल जाधव, द्वितीय मोहिनी येवले, तृतीय निखील मोरे, वैयक्तिक गीत गायन स्पर्धा प्रथम कल्याणी अहिरे, द्वितीय शितल खोकले, तृतीय सोनाली येवले अशाप्रकारे राजापूर केंद्रात बीट जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहाने पार पडल्या.

(फोटो ३० राजापूर)


 

Web Title: Zilla Parishad President's Cup competition in center school excited