कीर्तांगळीत बिबट्याचा बछडा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:22 IST2018-08-06T17:21:43+5:302018-08-06T17:22:00+5:30
सिन्नर: तालुक्यातील किर्तांगळी - निमगाव शिवाराच्या मध्यवर्ती ठिकाणी बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात जेरबंद झाला. तथापि, दोन बछडे व बिबट्या अद्यापही या परिसरात मुक्त संचार करीत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

कीर्तांगळीत बिबट्याचा बछडा जेरबंद
पंधरा दिवसापासून परिसरात मादी बिबट्या व तीन बछडे वावरताना ग्रामस्थांनी पाहिले होते. बिबट्याने हल्ला करून कुत्र्यांचा फडशा पाडला होता. शेतकºयांनी या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावल्यानतंर संध्याकाळच्या सुमारास एक बछडा अलगद पिंजºयात जेरबंद झाला. वनविभागाच्या कर्मचाºयांनी बछड्याची मादी पुन्हा पिंजºयाजवळ येईल या अपेक्षेने बछड्याला तेथेच ठेवले आहे.