वाघेरा येथील युवकाचा मारहाणीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:51 IST2021-03-16T22:13:53+5:302021-03-17T00:51:08+5:30
त्र्यंबकेश्वर : खाड्यांची वाडी ते शास्त्री नगर रस्त्यावर दुचाकीस्वार युवकाला अडवून सात जणांनी केलेल्या मारहाणीत वाघेरा येथील युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी (दि. १६) हरसूल पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वाघेरा येथील युवकाचा मारहाणीत मृत्यू
त्र्यंबकेश्वर : खाड्यांची वाडी ते शास्त्री नगर रस्त्यावर दुचाकीस्वार युवकाला अडवून सात जणांनी केलेल्या मारहाणीत वाघेरा येथील युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी (दि. १६) हरसूल पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तुकाराम विष्णू फसाळे (२०, रा.गंगाम्हाळुंगी) व त्याचा मावसभाऊ योगेश वाडगे (२०,रा.वाघेरा) आणि एक मुलगी असे तिघेजण दि.१३ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुचाकीने जात असतांना लखन पांडुरंग खाडे व त्याच्या सहा सहकाऱ्यांनी सदर दुचाकी अडवून तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात योगेश वाडगे यास लाथा बुक्क्यांचा वर्मी मार लागल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. ही खबर समजताच हरसूल पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. हरसूल पोलीस ठाण्यात फसाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लखन पांडुरंग खाडे, ज्ञानेश्वर हरी खाडे, महेंद्र रंगनाथ खाडे, पोपट संजय खाडे, दत्तू विष्णू खाडे व धर्मराज नवसु खाडे (सर्व रा.खाड्याची वाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.