राजदेरवाडीला तरुणांनी केली किल्ल्याची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 18:59 IST2019-02-18T18:58:56+5:302019-02-18T18:59:39+5:30
चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी येथे शिवजयंतीचे औचित्य साधून गावातील शिवस्वराज एकता मंचच्या तरुणांनी राजदेर किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली.

राजदेरवाडीला तरुणांनी केली किल्ल्याची स्वच्छता
या मोहिमेत राजदेरवाडीचे उपसरपंच मनोज शिंदे, धनंजय पाटील, सुरेश जाधव, वसंत जाधव, केतन शिंदे, शाहू शिंदे, हिरामण जाधव, धनंजय जाधव, सोपान शिंदे, दीपक शिंदे, शुभम जाधव, जनार्दन जाधव, किरण शिंदे आदींसह १०० शिवसैनिक सहभागी झाले होते. तरुणांनी राजदेर किल्ला परिसराची स्वच्छता करून वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचा मनोदय व्यक्त केला. गावातील इंद्रायणी किल्ल्याचीही स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच मनोज शिंदे यांनी दिली.