वावीजवळ कारच्या धडकेत युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:14 IST2018-04-24T00:14:42+5:302018-04-24T00:14:42+5:30
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर दुचाकीला कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १६ वर्षीय दुचाकीस्वार युवक ठार झाला. वावीजवळील सद्गुरु पेट्रोल पंपाजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.

वावीजवळ कारच्या धडकेत युवक ठार
सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर दुचाकीला कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १६ वर्षीय दुचाकीस्वार युवक ठार झाला. वावीजवळील सद्गुरु पेट्रोल पंपाजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. मूळ मध्य प्रदेशातील गोटेगाव तालुक्यातील रहिवासी असलेले मेहरा कुटुंब उपजीविकेसाठी वावी येथे काही दिवसांपासून राहात आहेत. सकाळी प्रवेश गणपत मेहरा (१६) हा युवक बजाज प्लॅटिना मोटारसायकलमध्ये (क्र. एमएच १७ बीयू २३९१) पेट्रोल भरण्यासाठी जात होता. दरम्यान त्याला कारने धडक दिली. याप्रकरणी वावी पोलिसांत कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश गवळी अधिक तपास करीत आहेत.
डोक्याला जबर मार
फोर्ड कारने पेट्रोलपंपाजवळ पाठीमागून येणाऱ्या (क्र. एमएच १५ बीएक्स ७२१४) दुचाकीला जबर धडक दिल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली. यात प्रवेश मेहरा याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. डोक्यालाच अधिक मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.