शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

युवक महोत्सव : नाशिक ब्रॅण्डिंगसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी

By sandeep.bhalerao | Updated: January 10, 2024 16:11 IST

राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारी रोजी नाशिक शहरात दाखल होत आहेत.

नाशिक: राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या युवकांमध्ये नाशिकचे ब्रॅण्डिंग करण्याची संधी असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.  राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारी रोजी नाशिक शहरात दाखल होत आहेत. त्यामुळे या महोत्सवाला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून महोत्सवात २२ देशातील सुमारे साडेसात हजार युवक सहभागी होणार आहेत.

देशाच्या कानाकोपऱ्यातून नाशिकमध्ये येणाऱ्या युवकांना महाराष्ट्र आणि पर्यायाने नाशिकच्या संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. रेल्वेस्थानकावर उतरणाऱ्या युवकांचे पारंपरिक स्वागत केले जाणार आहेच, याशिवाय त्यांना नाशिकची ओळख अधोरेखित करणारे वेलकम गिफ्ट देखील दिले जाणार आहे.

हजारोंच्या संख्येने नाशिकमध्ये पाच दिवस हे युवक ठिकठिकाणी थांबणार असल्याने त्यांच्यासाठी खासगी वाहनांची वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांवरील चालकांना पाहुण्यांशी कसे वागावे, बोलावे याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. नाशिकमध्ये पहिले पाऊल ठेवणाऱ्यांना इतर राज्यांमधील तरुणांसमोर नाशिकचे आदरातिथ्य सुयोग्य पद्धतीने व्हावे आणि त्या माध्यमातून नाशिकचे ब्रॅण्डिंग होणार असल्याने चालकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याच कारणास्तव चालकांना प्रशिक्षित केेले जात असल्याची माहिती क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक