सातव्या मजल्यावरून कोसळून युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:52 IST2020-11-27T00:51:17+5:302020-11-27T00:52:15+5:30
कमोदनगर येथील इमारतीच्या सातव्या मजल्यावरून कोसळून नितीन दगडुबा गाडेकर (२०) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सातव्या मजल्यावरून कोसळून युवक ठार
इंदिरानगर : कमोदनगर येथील इमारतीच्या सातव्या मजल्यावरून कोसळून नितीन दगडुबा गाडेकर (२०) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि२५) रोजी कमोदनगर येथील प्लेटिना टावर्सचे वॉचमन दगडुबा यांचा मुलगा नितीन हा रात्री ११ वाजेच्या सुमारास सातव्या मजल्याच्या गच्चीवरून खाली पडल्याने नितीनच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रात्री साडेअकरा वाजता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.