सारसाळेत युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:08 IST2019-06-15T01:08:28+5:302019-06-15T01:08:53+5:30

दिंडोरी तालुक्यातील सारसाळे येथील युवक लक्ष्मण गणपत वाघ (२२) याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडास गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली.

Youth Farmer Suicide in Sarasale | सारसाळेत युवा शेतकऱ्याची आत्महत्या

सारसाळेत युवा शेतकऱ्याची आत्महत्या

दिंडोरी : तालुक्यातील सारसाळे येथील युवक लक्ष्मण गणपत वाघ (२२) याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडास गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत वणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रु ग्णालयात पाठविला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मयत लक्ष्मण वाघ याच्या नावावर शेतजमीन नसून त्याचे आजोबा काशीनाथ कोंडाजी वाघ यांच्या नावावर शेतजमीन असल्याचे समजते. याबाबत वणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Youth Farmer Suicide in Sarasale