शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून नाशिकला युवा शेतक-याने रेल्वे रुळावर संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 7:36 PM

या कर्जबाजारीपणाला कंटाळून आलेल्या नैराश्यापोटी नाशिकमधील भगूर गावात राहणारे जगदीश बहिरू शिरसाठ (३७) या युवा शेतक-याने सोमवारी रेल्वे रुळावर आत्महत्त्या केल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देआत्महत्त्यापुर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याने खळबळसरकारकडून कुठलीही आश्वासने पुर्ण केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तवनाशिकमधील भगूर गावात राहणारे जगदीश बहिरू शिरसाठ (३७) या युवा शेतक-याने आत्महत्त्या केल्याचे समोर आले

नाशिक : शेती पिकविण्यासाठी घेतलेले कर्ज फेडताना आलेल्या नैराश्यातून नाशिकमधील भगूर गावातील युवा शेतक-याने रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेपुढे जीवनयात्रा संपविली; तत्पुर्वी त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याने खळबळ उडाली आहे.सत्ताधारी भाजपाच्या फडणवीस सरकारने शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा काही महिन्यांपुर्वी केली; मात्र त्याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. शेतक-यांच्या राज्यातील आत्महत्त्या रोखण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली आहे, असेही सरकारी दरबारातून वारंवार सांगितले गेले; मात्र प्रत्यक्षात शेतक-याच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी होण्यास सरकारकडून कुठलीही आश्वासने पुर्ण केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या कर्जबाजारीपणाला कंटाळून आलेल्या नैराश्यापोटी नाशिकमधील भगूर गावात राहणारे जगदीश बहिरू शिरसाठ (३७) या युवा शेतक-याने सोमवारी रेल्वे रुळावर आत्महत्त्या केल्याचे समोर आले आहे.

नाशिक जिल्हा हा बागायती जिल्हा म्हणून ओळखला जातो; मात्र या जिल्हयतही शेतक-यांच्या आत्महत्त्येचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. एकूणच शेतक-यांच्या आत्महत्त्या हा गंभीर प्रश्न बनत चालला असून राज्य सरकारने यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.

शिरसाठ यांच्यावर कर्जाचा बोझा होता. त्यांना पीक कर्जाच्या अनुदानाची रक्कम बॅँकेतून मिळाली नाही. असे त्यांनी चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. चिठ्ठीमधील त्यांच्या व्यथ्या त्यांच्याच शब्दांत ‘‘बॅँकेकडून पुढील आठवड्यापासून रक्कम मिळण्यास सुरूवात होईल, असे सांगण्यात आले.  आपल्या शेतीवर ९५ हजार रुपये कर्ज आहे. नैसर्गिक आपत्तीतून सावरु देत नाही आणि कर्जामुळे अडचणीत सापडलो आहे. त्यामुळे मी आत्त्महत्त्या करीत आहे, मला कोणीही आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त केलेले नाही. सदर माझी पत्नी सुरेखा हिस न्याय मिळावा... आपला शेतकरी, जगदीश बहिरु शिरसाठ’’

 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसagricultureशेती