वीज कोसळून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 00:18 IST2021-05-03T23:30:11+5:302021-05-04T00:18:45+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटीजवळील दौंडत रोडवर दारणा नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला.

Youth dies in power outage | वीज कोसळून युवकाचा मृत्यू

अहिलू देवराम शिद

ठळक मुद्दे इगतपुरी : नदीवर हातपाय धुण्यास जाताना घडली घटना

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटीजवळील दौंडत रोडवर दारणा नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला.

इगतपुरी तालुक्यातील खैरगाव (शिदवाडी) येथील अहिलू देवराम शिद (१७) हा युवक रविवारी (दि. २) आजोबासमवेत काही कामानिमित्त दौंडत रोड भागात आले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी अहिलू हा दौंडत रोडवर असलेल्या दारणा नदीवर हातपाय धुण्यासाठी गेला तेव्हा अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तत्पूर्वीच तो मयत झाला. खैरगावचे उपसरपंच गणेश गायकर यांनी घोटी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास हवालदार कोरडे करीत आहेत.
वीज कोसळून मयत झालेला युवक हा गरीब व आदिवासी कुटुंबातील असून शासनाने या युवकाच्या कुटुंबीयास तत्काळ अर्थसाहाय्य करण्याची मागणी सरपंच मारुती आघान, शेनवडचे उपसरपंच कैलास कडू आदींनी केली आहे.
 

Web Title: Youth dies in power outage