देवळ्यात भिंत कोसळून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 01:03 IST2020-02-14T01:02:52+5:302020-02-14T01:03:11+5:30

जुन्या घराच्या मातीची भिंत अंगावर कोसळून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी शहरातील आंबेडकरनगरात घडली.

 Youth dies after collapsing wall | देवळ्यात भिंत कोसळून युवकाचा मृत्यू

देवळ्यात भिंत कोसळून युवकाचा मृत्यू

देवळा : जुन्या घराच्या मातीची भिंत अंगावर कोसळून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी शहरातील आंबेडकरनगरात घडली.
सटाणा रस्त्यावरील आंबेडकरनगर परिसरात कैलास पवार यांच्या घराशेजारी एका घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. घरावरील पत्रे काढण्याचे काम सुरू असताना अचानक मातीची भिंत सागर कैलास पवार (२२) याच्यावर कोसळली. त्यात सागर गंभीर जखमी
झाला. त्याला उपचारासाठी तातडीने सटाणा येथे नेत असतांना त्याचा मृत्यू झाला.
सागर हा चांदवड येथे इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सटाणा येथे शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी देवळा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. सागर हा आरपीआय (आठवले गट) तालुका अध्यक्ष कैलास पवार यांचा मुलगा आहे.

Web Title:  Youth dies after collapsing wall