लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 01:32 PM2020-06-23T13:32:49+5:302020-06-23T13:37:58+5:30

नाशिक शहरात कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठया भावाची डोक्यात दगड घालून खून  केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील  पेठरोडवरील नामको हॉस्पिटलच्या संरक्षणभिंती जवळील परिसरात मंगळवारी सकाळी वाठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.  

The younger brother killed the older brother by throwing a stone at his head | लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून केला खून

लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून केला खून

Next
ठळक मुद्देपंचवटी परिसरात कौटुंबिक वादातूनखून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात घातला दगड

नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठया भावाची डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील  पेठरोडवरील नामको हॉस्पिटलच्या संरक्षणभिंती जवळील परिसरात मंगळवारी सक ाळी वाठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबादरोड विद्यानगर परिसरात राहणाºया संतोष सखाराम थोरे (४०) याची त्याचा लहान भाऊ सुनील सखाराम थोरे (३५ )याने दगड घालून हत्या केली. या प्रकरणी संशयित सुनिल सखाराम थोरे (३५) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष व सुनिल हे दोघे सख्खे भाऊ विद्यानगर येथे राहत असून संतोष बाजारसमितीत हमाली काम करत होता. तर सुनिल पेठरोड बाजारसमिती येथे मापारी काम करतो. मंगळवारी सकाळी मयत संतोष हा सुनिल काम करत असलेल्या बाजारसमितीतील गाळ्यावर गेला असताना मालकाने सुनिलला फोन करून तुझा भाऊ दारू पिऊन येथे शिवीगाळ करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर सुनिल संतोषला गाडीवर बसवून घरी सोडण्यासाठी जात असतांना संतोषने दारू प्यायची असल्याचे सांगत गाडी थांबवायला सांगितली. मात्र सुनिलने गाडी थांबविली नाही, त्यावरून दोघात बाचाबाची झाली असता संतोषने चालत्या गाडीवरून नामको हॉस्पिटलजवळ उडी मारली. त्यानंतर संतापाच्या भरात सुनिल याने मोठा दगड हातात उचलून संतोषच्या डोक्यात टाकला. हा  घाव वर्मी बसल्याने संतोषचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे वृत्त समजताच  वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत हवालदार संजय वानखेडे, सुरेश नरवाडे, संतोष काकड, शेखर फरताळे, महेश साळुंके, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, या घटनेनंतर संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला होता. अखेर पोलिसांनी संशयिताचा सुनील याचा माग घेत त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले असून शेवटचे वृत्त मिळेपर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, पंचवटीतल मोरे मळा परिसरातही तीन आठवड्यांपूर्वी अशाचप्रकारे कौटुंबिक वादातून दिराने भावजयीवर राहत्या घरातच धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे या परिसरात गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: The younger brother killed the older brother by throwing a stone at his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.