तरुणीचा विनयभंग, संशयित अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 01:29 IST2021-01-25T01:28:49+5:302021-01-25T01:29:35+5:30
क्लासवरून घरी परतणाऱ्या तरुणीचा पाठलाग करत तिचा हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीस पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.

तरुणीचा विनयभंग, संशयित अटकेत
नाशिक : क्लासवरून घरी परतणाऱ्या तरुणीचा पाठलाग करत तिचा हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीस पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.
मोबाइलवर मॅसेज पाठवून लग्नाची मागणी करतानाच नकार दिला तर बदनामी करण्याची धमकी देणाऱ्या रोहिनीनगर, पेठरोड परिसरातील संशयित यश प्रकाश घोलप (२१) याच्याविरोधात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पीडित तरुणी २१ ते २३ जानेवारी दरम्यान क्लासवरून घरी जात असताना संशयित यश घोलप याने तिचा पाठलाग करत रस्ता अडवत तिचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी कारवाई करीत संशयित यशला शनिवारी अटक केली.