नाशकातील एका गार्डनमध्ये तरुणावर सुरीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 05:05 PM2021-05-15T17:05:44+5:302021-05-15T17:08:38+5:30

नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत अशून शुक्रवारी दुपारच्या सुमारास द्वारका परिसरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णलयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये बसलेल्या दोघांवर दोन अज्ञातांनी हल्ला करून एका तरुणाला सुरीने वार करीत जखमी केल्याचा प्रकार घडला आहे.

A young man is stabbed in a garden in Nashik | नाशकातील एका गार्डनमध्ये तरुणावर सुरीने वार

नाशकातील एका गार्डनमध्ये तरुणावर सुरीने वार

Next
ठळक मुद्देगार्डनमध्ये बसलेल्या दोघांना मारहाण जुन्या भांडणाच्या कुरापतीतून हल्ला सुरीने वार केल्याने एका तरुणाला दुखापत

नाशिक : शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत अशून शुक्रवारी दुपारच्या सुमारास द्वारका परिसरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णलयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये बसलेल्या दोघांवर दोन अज्ञातांनी हल्ला करून एका तरुणाला सुरीने वार करीत जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. झाकीर हूसेन हॉस्पीटलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये बसलेल्या दोघांना अज्ञात हल्लेखोरांनी मारहाण करीत एकाच्या हातांवर सुरीने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) घडली. गौरव नरेंद्र काथवटे (१७, रा. सावरकर चौक. भोई गल्ली) व त्याचा मामेभाऊ असे दोघे जण डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये बसलेले असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी काथवटे याच्या मामेभावाला मागील भांडणाची कुरापत काढून शिवगाळ करीत लाथा बुक्यांनी मारहाण केली. यावेळी काथवडे मध्यस्थी करून त्यांच्या मामेभावाला सोडविण्यास गेला असचा हल्लेखोरांनी त्यांच्याही दोन्ही हातांवर सुरीने वार करून दुखापत केली. या प्रकरणी गौरव काथवटे याने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A young man is stabbed in a garden in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app