हार्वेस्टरवर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:20 IST2021-02-18T20:48:42+5:302021-02-19T01:20:19+5:30
नगरसूल : येथील रस्त्यालगत उभ्या असलेल्या शेतात वापरल्या जाणाऱ्या हार्वेस्टर मशीनवर दुचाकी आदळून एका तरुणाचा मृत्यू झाला.

हार्वेस्टरवर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू
नगरसूल : येथील रस्त्यालगत उभ्या असलेल्या शेतात वापरल्या जाणाऱ्या हार्वेस्टर मशीनवर दुचाकी आदळून एका तरुणाचा मृत्यू झाला.
नगरसुल पोलिस स्टेशन जवळील येवला-नांदगाव रोड लगतच्या वळणावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गहु काढणीच्या मशीनवर नगरसुल येथील तरुण सागर धनवटे (३३) हा मोटार सायकलने (क्रमांक एमएच १५ जीएच ८२०३) नगरसुलकडे येत असतांना वळणाचा अंदाज न आल्यामुळे जोरात आदळल्याने तो गंभीर जखमी झाला.
त्याच्यावर गावात प्राथमिक उपचार करुन येवला येथे पुढील उपचारार्थ ग्रामिण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. येवला तालुका पोलिस स्टेशनमध्ये या अपघाताची नोंद केली असुन घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.