मालेगावी गळफास लागून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 01:23 IST2021-09-16T01:21:46+5:302021-09-16T01:23:39+5:30
मालेगाव : शहरातील पोल्ट्रीफार्ममध्ये काम करीत असताना अंडी काढण्याच्या यंत्रात शर्ट अडकून गळफास बसल्याने तेथे काम करणारा तरुण अरुण लक्ष्मण गवळी याचा मृत्यू झाला.

मालेगावी गळफास लागून तरुणाचा मृत्यू
मालेगाव : शहरातील पोल्ट्रीफार्ममध्ये काम करीत असताना अंडी काढण्याच्या यंत्रात शर्ट अडकून गळफास बसल्याने तेथे काम करणारा तालुक्यातील सवंदगाव येथील तरुण अरुण लक्ष्मण गवळी याचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. अफजल वसीम मिर्झा (४२) रा. गुलाब पार्क यांनी पोलिसांत खबर दिली. पवारवाडी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस नाईक निकम करीत आहेत.