शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

‘ब्ल्यू व्हेल’च्या नादात युवकाने मनगटाच्या कापल्या नसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 01:50 IST

ऑनलाइन खेळले जाणारे विविध गेम्स आता तरुणांच्या जीवावर उठू लागले आहेत. पब्जीनंतर आता ब्ल्यू व्हेल या ऑनलाइन गेमचा एक युवक नाशिक रोडमधील गायकवाड मळ्यात बळी ठरला. या युवक घरी एकटा असताना ब्ल्यू व्हेल गेम खेळत होता. यावेळी त्याने अचानकपणे त्याच्या दोन्ही मनगटांच्या नसा कापून घेत जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना घडली.

ठळक मुद्देधक्कादायक : नाशिक रोड परिसरात घडलेल्या घटनेने हळहळ

नाशिक रोड : ऑनलाइन खेळले जाणारे विविध गेम्स आता तरुणांच्या जीवावर उठू लागले आहेत. पब्जीनंतर आता ब्ल्यू व्हेल या ऑनलाइन गेमचा एक युवक नाशिक रोडमधील गायकवाड मळ्यात बळी ठरला. या युवक घरी एकटा असताना ब्ल्यू व्हेल गेम खेळत होता. यावेळी त्याने अचानकपणे त्याच्या दोन्ही मनगटांच्या नसा कापून घेत जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना घडली.

मुक्तीधाम शेजारी असलेल्या गायकवाड मळा येथे वाळुजी संकुलमध्ये प्रमोद जाधव हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. त्यांचा अठरावर्षीय मुलगा तुषार जाधव हा मोबाइलवर ऑनलाइन ब्ल्यू व्हेल नावाचा गेम काही दिवसांपासून खेळत होत. या गेमच्या आहारी तुषार गेल्याचे समोर आले. तुषारने बुधवारी (दि.२९) राहत्या घरी एकटा असताना गेम खेळण्यास सुरुवात केली. या दरम्यान, तुषारने चक्क आपल्या दोन्ही मनगटांवर धारधार वस्तूने जखमा करून घेतल्या तसेच फिनाइलचे सेवन करत घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार त्याचे पालक घरी आल्यानंतर उघडकीस आला. जाधव कुटुंबीय संध्याकाळी जेव्हा घरी आले, तेव्हा घराचे दोन्ही दरवाजे बंद होते. त्यांनी घराची बेल वाजवली अन् दरवाजाही जोरजोराने ठोठावला. मात्र, आतमधून कुठलाही प्रतिसाद आला नाही. दरम्यान, प्रमोद जाधव यांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला असता त्यांना तुषार गळफास घेतलेल्या मृतावस्थेत दिसून आला.

ऑनलाइन ब्ल्यू व्हेल खेळाच्या आहारी गेल्याने तुषार याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, या प्रकाराचा पुढील तपास उपनगर पोलिसांकडून केला जात आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तुषारच्या मृत्यूने गायकवाड मळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा पालकांनी मुलांच्या मोबाइल वापरावर लक्ष केंद्रित करत आपली मुले नेमके कोणते मोबाइल गेम्स खेळत आहेत, हे वेळोवेळी तपासणे अत्यावश्यक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी