टोळक्याच्या मारहाणीत तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 00:43 IST2021-07-17T00:42:47+5:302021-07-17T00:43:27+5:30
हॉटेलमधून जेवण करून घराकडे परतणाऱ्या दोघा मित्रांना परिचित टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना हिरावाडी रोड भागात घडली. या घटनेत लाकडी स्टम्पचा वापर करण्यात आल्याने तरुण जखमी झाला असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोळक्याच्या मारहाणीत तरुण जखमी
नाशिक : हॉटेलमधून जेवण करून घराकडे परतणाऱ्या दोघा मित्रांना परिचित टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना हिरावाडी रोड भागात घडली. या घटनेत लाकडी स्टम्पचा वापर करण्यात आल्याने तरुण जखमी झाला असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर वाघ, हृषिकेश धात्रक, जयंत अग्रवाल व गोविंद नामक तरुण अशी तरुणास मारहाण करणाऱ्या परिचितांची नावे आहेत. या प्रकरणी निशांत प्रवीण मोरे या तरुणाने तक्रार दाखल केली आहे. मोरे हा रविवारी (दि.११) रात्री मित्र शुभम कोकणी याच्यासमवेत जेवणासाठी परिसरातील हॉटेलमध्ये गेला होता. जेवण आटोपून दोघे मित्र घराकडे परतत असताना ही घटना घडली. हिरावाडी भागातील पाटाच्या रोडने ते जात असताना मीनाताई स्टेडिअमच्या प्रवेशद्वाराजवळ चार जणांच्या टोळक्याने त्यांना अडविले व आम्हाला पाहून का पळाले, असा जाब विचारत, दोघा मित्रांना शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी स्टम्पने बेदम मारहाण केली.