ज्योतिषी असल्याचे दावे करत वेगवेगळ्या महिलांना भूल देऊन, फसवून अत्याचार करणाऱ्या अशोक खरातचे पितळ उघडे पडले. अनेक राजकारण्यांसोबतचे त्याचे फोटोही समोर आले. पण, या प्रकरणातील काही व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या कृत्यांची तीव्रता राज्याला कळाली. जेव्हा पोलीस अशोक खरातलाअटक करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्याने पोलिसांनाच भीती घातली आणि धमक्या दिल्या.
गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक खरातला बुधवारी पहाटे गुप्त कारवाई करत ताब्यात घेतले. अटक करायला गेलेल्या पोलिसांवरच अशोक खरात भडकला होता. पोलिसांनी त्याला खाकीचा दम देताच तो आणखी आक्रमक झाला आणि भीती घातली.
"तुम्ही घोर अपराध करत आहात. तुमच्यावर कोप होईल", असे म्हणत त्याने पोलिसांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याची कानउघाडणी केली आणि लगेच बेड्या ठोकल्या. त्यामुळे त्याचा पोलिसांच्या ताब्यात असतानाही बराच काळ थयथयाट सुरूच होता.
घरात चोर शिरला, खरातच्या अटकेचा घटनाक्रम
अशोक खरातला अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांनी ऑपरेशन रणनीती तयार केली होती. पाच पथके तयार करण्यात आले. या पथकातील कोणत्याही कर्मचाऱ्याला या कारवाईची माहिती दिली गेली नव्हती.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, तर त्याचा सामना करण्यासाठी पोलिसांना लाठ्या, हेल्मेट आणि शिल्डसह तयार राहण्यास सांगण्यात आले होते. ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला, त्यांनाही अटकेच्या कारवाईपासून दूर ठेवले गेले होते.
घरात चोर शिरल्याचे सांगत पोलिसांनी अशोक खरातच्या घरात धाड टाकली. तुमची चौकशी करायची आहे, असे सांगून त्याला पोलीस ठाण्यात चला असे सांगण्यात आले. मात्र, अटकेची कुणकुण खरातला लागल्यानंतर त्याने पोलिसांनाही घाबरवण्याचा प्रयत्न केला.
Web Summary : Ashok Kharat, accused of exploiting women, threatened police during his arrest. Police used a ruse, claiming a break-in, to detain him. Kharat, feigning innocence, warned of divine retribution, but was swiftly arrested. He resisted arrest, but police were prepared.
Web Summary : महिलाओं का शोषण करने के आरोपी अशोक खरात ने गिरफ्तारी के दौरान पुलिस को धमकी दी। पुलिस ने सेंधमारी का दावा करते हुए उसे हिरासत में लिया। खरात ने दैवीय प्रतिशोध की चेतावनी दी, लेकिन उसे तुरंत गिरफ्तार कर लिया गया। उसने विरोध किया, लेकिन पुलिस तैयार थी।