येवला मुक्तिभूमी धर्मांतराचा पाया, दीक्षाभूमी कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 10:14 PM2021-10-12T22:14:04+5:302021-10-12T22:17:25+5:30

येवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे ह्यमी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाहीह्ण अशा शब्दात केलेल्या धर्मांतराच्या घोषणेला बुधवारी (दि.१३) ८६ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी येवल्याच्या मुक्तीभूमीवर दाखल व्हायचे. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने पाच दिवस ऑनलाईन मुक्ती महोत्सव साजरा केला जाणार आहे.

Yeola Muktibhoomi foundation of conversion, Deekshabhoomi summit | येवला मुक्तिभूमी धर्मांतराचा पाया, दीक्षाभूमी कळस

येवला मुक्तिभूमी धर्मांतराचा पाया, दीक्षाभूमी कळस

Next
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेबांच्या धर्मांतर घोषणेच्या ८६व्या वर्धापनदिनी ऑनलाईन कार्यक्रम

योगेंद्र वाघ

येवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे ह्यमी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाहीह्ण अशा शब्दात केलेल्या धर्मांतराच्या घोषणेला बुधवारी (दि.१३) ८६ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी येवल्याच्या मुक्तीभूमीवर दाखल व्हायचे. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने पाच दिवस ऑनलाईन मुक्ती महोत्सव साजरा केला जाणार आहे.

येवल्याच्या ऐतिहासिक भूमीस जगभरात ह्यमुक्तिभूमीह्ण म्हणून ओळखले जाते. धर्मांतराच्या ऐतिहासिक घोषणेनंतर तब्बल २१ वर्षांनी १३ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर घोषणेची प्रतिज्ञापूर्ती केली होती. त्यामुळे नागपूर हा धर्मांतराचा कळस तर येवला मुक्तिभूमी धर्मांतराचा पाया असल्याचे म्हटले जाते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येथील मुक्तिभूमीवर आंबेडकर अनुयायी, आंबेडकरप्रेमी व बौद्ध बांधव १३ ऑक्टोबर रोजी दरवर्षी ह्यजयभीमह्णचा जयघोष करत लाखोंच्या संख्येने येत असतात. ऐतिहासिक संदर्भ असलेल्या या मुक्तिभूमीवर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भव्यदिव्य स्मारक उभे राहिले आहे. शासनाच्या ४.३३ हेक्टर जागेत सदर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक साकारले आहे.

स्मारकात ५९२.४४ चौरस मीटरचे विश्वभूषण स्तूप, ६९२.४४ चौरस मीटरचा विपश्यना हॉल, इलेक्ट्रिक रूम, तोरण गेट, संरक्षण भिंत आदी कामे करण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराजवळच १२ फूट चौथ-यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला असून दालनात १८ फूट उंचीची तथागत गौतम बुद्धांची मूर्तीही बसविण्यात आली आहे. याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दालनात धर्मांतरण घोषणा व मंदिर प्रवेशाबाबतची भित्तिशिल्प, डॉ. आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील भित्तिशिल्पेही साकारण्यात आली आहे. स्मारक परिसरात सुंदर बगीचाही करण्यात आला आहे.
शासनाने मुक्तिभूमी परिसर विकासासाठी आतापर्यंत २१ कोटी रुपये खर्च केले आहेत. भविष्यात शंभर अनुयायांसाठी पाठशाळा, अ‍ॅम्फिथिएटर, भिक्खू निवास, विपश्यना हॉल, कर्मचारी निवासस्थान आदी कामे प्रस्तावित आहेत. येवला मुक्तिभूमी ही दीक्षाभूमी व चैत्यभूमीप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी पवित्रस्थळ म्हणून विकसित झाले आहे. सध्या या परिसराच्या देखभालीचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे. बार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम वर्षभर राबविले जात असतात.


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणेचा ८६ वा वर्धापन दिनानिमित्त दि. १३ ते १७ ऑक्टोबर दरम्यान रोज सायंकाळी ६ ते ७:३० वा.ऑनलाईन ह्यमुक्ती महोत्सव २०२१ - मुक्तीभूमी येवलाह्ण हा कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवात देश विदेशातील सुप्रसिद्ध विचारवंत,साहित्यिक, कलावंत,सनदी अधिकारी सहभागी होणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन दि. १३ रोजी सायंकाळी ६ वा. सुप्रसिद्ध वैद्य डॉ.संग्राम पाटील (लंडन) यांच्या हस्ते होणार आहे.

दि. १४ रोजी सायंकाळी ६ वा.परिसंवाद ह्यमहाकवी वामनदादा कर्डक यांचे शाहिरी,साहित्यातील संविधानिक मूल्यविचारह्ण या विषयावर परिसंवाद होणार असून यात प्रा. डॉ.उत्तम अंभोरे, डॉ. किशोर वाघ, कवी विनायक पाठारे सहभागी होणार आहेत. दि. १५ रोजी डॉ.आंबेडकरांची पत्रकारिता आणि आजची प्रसारमाध्यमे या विषयावर परिसंवाद होणार असून यात डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रा.अर्जुन कोकाटे सहभागी होतील. तर दि. १६ रोजी सायंकाळी ४ वा. होणाऱ्या व्याख्यानात इ. झेड. खोब्रागडे, मनीषा पोटे सहभागी होणार असून दि. १७ रोजी समारोप होणार आहे.

Web Title: Yeola Muktibhoomi foundation of conversion, Deekshabhoomi summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app