शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

येसोजी महाराज वीर मिरवणूक

By admin | Updated: March 29, 2017 00:28 IST

नाशिक : घनकर गल्लीमधील मानाचा वीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येसोजी महाराज ऊर्फ दाजिबा वीराची मिरवणूक मंगळवारी (दि.२८) जल्लोषात काढण्यात आली.

गुढीपाडवा : भाविकांची दर्शनासाठी गर्दी नाशिक : घनकर गल्लीमधील मानाचा वीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येसोजी महाराज ऊर्फ दाजिबा वीराची मिरवणूक मंगळवारी (दि.२८) जल्लोषात काढण्यात आली. पारंपरिक वाद्यवादन करत घनकर गल्लीमधील तुळजा भवानी मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुवासिनी महिलांसह पुरुष भाविकांनीही वीराचे दर्शन घेतले. मानाचा येसोजी महाराज यांचा चांदीचा मुखवटा परिधान करून वीराने नृत्य करत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. मिरवणुकीने रामकुंड येथे वीराने पोहचून गोदापात्रात पाय धुवून परंपरेप्रमाणे वाजत गाजत पुन्हा घनकर लेन येथील मंदिराजवळ प्रस्थान केले. सुमारे दीडशे वर्षे जुन्या प्राचीन परंपरेनुसार येसोजी महाराज वीराच्या मिरवणुकीमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. युवकांनी वीरासोबत नृत्य करत घनकर गल्ली, रविवार कारंजा, सराफ बाजारमार्गे रामकुंडावर पोहचून गोदापात्रात परंपरेनुसार पाय धुतले. यावर्षी मिरवणुकीत वीराच्या भूमिकेत विशाल मोरे हे होते. दरवर्षी या मानाच्या येसोजी मिरवणूक धूलिवंदनाला निघते. मात्र मोरे कुटुंबीयांमध्ये मुलाचा जन्म झाल्याने वीराची मिरवणूक गुढीपाडव्याला काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मोरे कुटुंबीयामधील सदस्यांनी सांगितले. मिरवणुकीत संभाजी मोरे, केशव मोरे, दिलीप मोरे, बापू मोरे, माधव मोरे, शरद मोरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)