स्पर्धा परीक्षेतील यशवंतांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:46 IST2018-07-10T00:46:01+5:302018-07-10T00:46:35+5:30
परमपूज्य निर्मलादेवीप्रणीत सहजयोग परिवार आणि शुभदायिनी मित्रमंडळ, नाशिक यांच्या सयुंक्त विद्यमाने यूपीएससी व एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

स्पर्धा परीक्षेतील यशवंतांचा गौरव
नाशिक : परमपूज्य निर्मलादेवीप्रणीत सहजयोग परिवार आणि शुभदायिनी मित्रमंडळ, नाशिक यांच्या सयुंक्त विद्यमाने यूपीएससी व एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि. ८) झालेल्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, माजी आमदार निशीगंधा मोगल, फ्रावशीचे रतन लथ, नगरसेवक दिनकर पाटील, हिमगौरी आडके, रवींद्र देवरे, जी.एस.टी.उपायुक्त मधुकर पाटील उपस्थित होते. यावेळी निलिमा पवार यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना भावीवाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नगरसेवक डॉ. वर्षा भालेराव प्रास्ताविक केले. अनिल भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
यांचा झाला गौरव
यूपीएससीमधून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडंटपदी निवड झालेले अभिजित खैरनार, केंद्रीय प्रशासकीय सेवेत निवड झालेले यतिष देशमुख, चेतन शेळके, डॉ. विशाखा भदाणे, महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत निवड झालेले प्रदीप फुंदे, वृषाली पवार, विजया पवार, किरण उघडे, सूरज देवरे, वैभव पवार, सुशील सोनवणे, स्नेहल केदारे, विशाल महापुरे, सोनाली पाटील आणि वैभव रूपवते या व इतर यशस्वी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.