यशवंतनगर येथे घरफोडीत ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 01:12 IST2020-02-17T01:11:45+5:302020-02-17T01:12:48+5:30
नाशिक-पुणे मार्गावरील आरटीओ कॉलनी, यशवंतनगर येथे फ्लॅटच्या स्वयंपाकगृहाच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी ५२ हजारांचा ऐवज चोरून नेला.

यशवंतनगर येथे घरफोडीत ऐवज लंपास
नाशिकरोड : नाशिक-पुणे मार्गावरील आरटीओ कॉलनी, यशवंतनगर येथे फ्लॅटच्या स्वयंपाकगृहाच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी ५२ हजारांचा ऐवज चोरून नेला.
यशवंतनगरमधील श्री समर्थ बंगलो येथे राहणारे अनिल चंद्रकांत नागपुरे यांच्या फ्लॅटच्या स्वयंपाकगृहाचे गज अज्ञात चोरट्याने कापून प्रवेश केला. कपाटातून सोन्याची अंगठी, सोनसाखळी, चांदीचे पूजेचे ताट, दोन निरंजन्या, जोडवे असा एकूण ५२ हजार ५०० रु पयांचा ऐवज चोरीस गेला.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.