विंचुरीदळवीत शेतकरी सन्मान यादीचे वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:42 PM2019-06-25T18:42:15+5:302019-06-25T18:42:30+5:30

सिन्नर : केंद्र शासनामार्फत शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेची व्याप्ती वाढवून दोन हेक्टरवरील पात्र शेतकऱ्यांनाही तीन समान हप्त्यात वार्षिक सहा हजार रूपये अनुदान बॅँक खात्यावर देण्यात येणार आहे.

Writers of Honorary Recruitment | विंचुरीदळवीत शेतकरी सन्मान यादीचे वाचन

विंचुरीदळवीत शेतकरी सन्मान यादीचे वाचन

Next

सिन्नर : केंद्र शासनामार्फत शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेची व्याप्ती वाढवून दोन हेक्टरवरील पात्र शेतकऱ्यांनाही तीन समान हप्त्यात वार्षिक सहा हजार रूपये अनुदान बॅँक खात्यावर देण्यात येणार आहे. त्यानुसार दोन हेक्टरवरील पात्र, अपात्र शेतकऱ्यांची यादी चावडीवाचन तालुक्यातील विंचुरदळवी येथे शनिवार (दि.२२) सकाळी ९.३० वाजता ग्रामसभेत करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी पत्राचे वाचन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व सरपंचांना पाठवलेल्या पत्राचे वाचन करण्याकरीता व त्यांनी सूचित केलेल्या जलशक्ती अभियानाचे नियोजन करण्यासाठी लक्ष्मणगिरी महाराज व्यापारी संकुल चौकातील मारूती मंदिराचे पारावर विशेष ग्रामसभा घेण्यात आली.
यावेळी विस्तार अधिकारी पी. एम. बिब्बे, सरपंच संगीता पवार, उपसरपंच भास्कर चंद्रे, शांताराम दळवी, सुरेश भोर, संपत चंद्रे, अंगणवाडी कार्यकर्ती माधूरी दळवी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. १४ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यातील शेत रस्त्यांच्या कामाबाबत माहिती देण्यात आली. मार्चअखेर थकबाकी असणाºया खातेदारांनी ग्रामपंचायतीचे कर भरावे असे आवाहन करण्यात आले. स्मार्ट ग्राम बक्षीस रकमेतून लवकरच घंटा गाडी ग्रामस्थांच्या सेवेत दाखल होत असल्याचे गिरी यांनी सांगितले.

Web Title: Writers of Honorary Recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी