शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविक्रम :५१ कला-ताल, श्लोकचा साधला संगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:07 IST

विविध कलागुणांना वाव मिळावा, संस्कृतीची जोपासना व्हावी, श्लोकांचे आजच्या पिढीला महत्त्व कळावे, या उद्देशाने ‘शिवराय’ या वाद्य पथकाने ताल, श्लोक ही संकल्पना घेऊन तब्बल सहा तास ढोलवादनाबरोबरच ५१ कलांचा आविष्कार सादर करत विश्वविक्रम नोंदविला. यावेळी कलाविष्कारासह ‘एक ताल एक श्लोक’ यांचा आगळा संगम पहावयास मिळाला.

नाशिक : विविध कलागुणांना वाव मिळावा, संस्कृतीची जोपासना व्हावी, श्लोकांचे आजच्या पिढीला महत्त्व कळावे, या उद्देशाने ‘शिवराय’ या वाद्य पथकाने ताल, श्लोक ही संकल्पना घेऊन तब्बल सहा तास ढोलवादनाबरोबरच ५१ कलांचा आविष्कार सादर करत विश्वविक्रम नोंदविला. यावेळी कलाविष्कारासह ‘एक ताल एक श्लोक’ यांचा आगळा संगम पहावयास मिळाला.शिवराय वाद्य पथकाने शहरातील गंगापूररोड परिसरातील विश्वास लॉन्स येथे रविवारी (दि.६) ढोलवादनाचा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी शुभश्री बहुद्देशीय संस्थेच्या विविध चित्रकार, शिल्पकार, कलाकारांनी तब्बल ५१ पेक्षा अधिक कलांमधून विविध नावीन्यपूर्ण कलाकृतींचे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस श्लोकांचे पठण करत उपस्थित वादक, कलाकार, चित्रकारांना ऊर्जा दिली. दोनशे वादकांनी शिवताल, ढोलीबाजा, गझर, नाशिक ढोल, भीमरुपी, भांगडा, पुणे ढोल, संबळ, रमण बाग अशा एकापेक्षा एक सुमारे ५१ तालांवर वादकांनी ढोल-ताशाचे वादन करीत विक्रम नोंदविला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. नेहरू सदरा त्यावर लाल जॅकेट अशा पोशाखात सर्व वादकांनी ढोलवादनामध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान, या उपक्रमाची नोंद जिनिअस बुक, एशिया बुक व वर्ल्ड रिकॉर्ड बुक इंडिया, वंडर बुक आॅफ लंडन यामध्ये या उपक्रमाची नोंद करण्यात आली आहे. लिम्का बुकसाठी या उपक्रमाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती अमी छेडा यांनी दिली.