जागतिक वारसा सप्ताह; शस्त्रास्त्र, नाणी प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:21 IST2018-11-20T00:21:02+5:302018-11-20T00:21:20+5:30
जागतिक वारसा सप्ताहनिमित्त सहायक संचालक पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय आणि अभिरक्षक प्रादेशिक वस्तू संग्रहालय तसेच सराफ असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारवाडा, सराफ बाजार येथे शस्त्रास्त्र, नाणी व हस्तलिखित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

जागतिक वारसा सप्ताह; शस्त्रास्त्र, नाणी प्रदर्शन
नाशिक : जागतिक वारसा सप्ताहनिमित्त सहायक संचालक पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय आणि अभिरक्षक प्रादेशिक वस्तू संग्रहालय तसेच सराफ असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारवाडा, सराफ बाजार येथे शस्त्रास्त्र, नाणी व हस्तलिखित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. जागतिक वारसा सप्ताहनिमित्त दि. १९ ते २५ नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शस्त्रास्त्र व नाणी प्रदर्शनाचे उद्घाटन सरकारवाडा येथे सोमवारी (दि. १९) इतिहास तज्ज्ञ गिरीश टकले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाशिकच्या विविध नाणेसंग्रहकांसह चेतन राजापूरकर यांचा नाणी प्रदर्शन तसेच डॉ. अनिता जोशी यांचे जुन्या हस्तलिखिताचे प्रदर्शन मांडलेले आहे. याप्रसंगी गडकिल्ले संवर्धन समितीचे सदस्य चेतन राजापूरकर, राजेश जुन्नरे, धामणे, नलिनी गुजराथी, योगेश कासार, जया वाहणे, सुरेश भडांगे, सचिन पगारे, शरद चौधरी, दिलीप सोनवणे, विजयकुमार धुमाळ आदी उपस्थित होते.