शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

जागतिक अर्थव्यवस्था अधांतरी अभय टिळक : ‘संक्रमणपर्वातील जग-भारत’ विषयावर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:45 AM

नाशिक : यंत्रमानवाच्या वापरात होत असलेली वाढ, आर्थिक पुनर्रचन, मध्यवर्गीयांची आर्थिक स्तर वाढवण्यासाठी चाललेली धरपड, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जगभरातील शासनाकडून कर्ज काढण्याचे वाढणारे प्रमाण यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अद्यापही संक्रमणातून जात आहे.

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात बॅँका डबघाईसआर्थिक पुनर्रचनेला दमदार सुरुवात

नाशिक : यंत्रमानवाच्या वापरात होत असलेली वाढ, आर्थिक पुनर्रचन, मध्यवर्गीयांची आर्थिक स्तर वाढवण्यासाठी चाललेली धरपड, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जगभरातील शासनाकडून कर्ज काढण्याचे वाढणारे प्रमाण यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अद्यापही संक्रमणातून जात असून, तिला सावरण्यास हळू हळू सुरुवात होत आहे, असे प्रतिपादन अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभय टिळक यांनी केले.श्री समर्थ सहकारी बॅँकेच्या वतीने कै. मधुकर कुलकर्णी यांच्या ७व्या स्मृतिदिनानिमित्त ‘संक्रमणपर्वातील जग आणि भारत’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात शुक्रवारी (दि.२९) व्याख्यानात टिळक पुढे म्हणाले की, अमेरिकेने मोठ्या प्रमाणात दिलेली कर्जे आणि त्याची न होत असलेली परतफेड यामुळे मोठ्या प्रमाणात बॅँका डबघाईस गेल्या व त्याचा परिणाम भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेवर झाला. २००८ साली झालेल्या या घटनेनंतर अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांनी हे प्रकरण २०२० पर्यंत स्थिरावू शकेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्याकाळी अमेरिकन जनतेने त्यांना गांभिर्याने घेतले नव्हते पण आज त्यांची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरत असून आर्थिक पुनर्रचनेला आता दमदार सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक संक्रमणात यंत्रमानवाचा वाढत चाललेला वापर बेरोजगारी वाढवणारा ठरेल की काय इतपत भयावह स्थिती निर्माण झाली आहे.अमेरिकेची डगमगलेली अर्थव्यवस्था केवळ अमेरिकेलाच त्रासदायक न ठरता ती जगभरातील अर्थव्यवस्थेला मारक ठरली आहे. जगभरातील सरकारांना त्यामुळे कर्जे घ्यावी लागली. त्याची परतफेड न झाल्याने आणखी कर्जे घ्यावी लागली. जगभरातील उद्योग, व्यवसाय या सर्व विकसित पट्ट्यात सरकार आजही कर्जबाजारी असून हे चित्र बदलण्यास आत्ताशी सुरुवात झाली आहे. त्याुळे अर्थव्यवस्थेची गुंतागुंत समजावून घेणे आवश्यक बनले आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. जागतिकीकरण वाढत चालले असताना स्थानिक वस्तूंना, स्थानिक बाजारपेठ, स्थानिक ग्राहकांना स्थानिक स्तरावरच त्याचा लाभ मिळणे या गोष्टी झाल्या पाहिजे, असा विचारही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी मधुकर कुलकर्णी यांच्या जीवनावर चित्रफित दाखविण्यात आली. अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांनी टिळक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.पुणेकर आहे, पण पुणेरी नाहीकार्यक्रमाच्या प्रारंभी टिळक यांचा पुणेकर, असा परिचय करून देण्यात आला. त्यावर आपला जन्म पुण्यात, सदाशिव पेठेत झाला असून, आडनाव टिळक असल्याने त्या अर्थाने पुणेकर असलो तरी पुणेरी संस्काराचा नाही असे स्पष्टीकरण देताच सभागृहात हशा पिकला.