नांदगावी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 15:59 IST2021-01-22T15:59:09+5:302021-01-22T15:59:33+5:30
नांदगाव : येथील नांदगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त माधुरी पवार यांनी मार्गदर्शन केले.

नांदगावी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची कार्यशाळा
विक्रेत्यांनी वर्गीकृत औषध विक्री करताना नियमांचे पालन केलेच पाहिजे, तसेच औषध विक्री करतानाच रुग्णांना समुपदेशन केले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले. यावेळी औषध निरीक्षक महेश देशपांडे उपस्थित होते. पवार यांचा सत्कार सोनल दुगड यांनी केला. औषध निरीक्षकांचा सत्कार महावीर सुराणा यांनी केला.
या कार्यशाळेस दिलीप पारख, सागर गोयेकर, सुनील दुगड, अजित रौदळ, आशुतोष गुंजाळ, बनसोडे, नीरज सुराणा, मोहित, किरण आदींसह नांदगाव, मनमाड, जातेगाव, बोलठाण, वेहळगाव, हिसवळ, वडाळी, न्यायाडोंगरी, साकोरा आदी ग्रामीण भागातील सर्व केमिस्ट उपस्थित होते. प्रास्तविक महेश सोनवणे यांनी तर आभार आशुतोष गुंजाळ यांनी मानले. संजय लोहाडे यांनी सूत्रसंचालन केले.