शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी?

By admin | Updated: April 9, 2017 00:09 IST

नाशिक : महापालिकेत भाजपाने कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी प्रभाग समित्यांवरही प्रत्येकी २ सदस्य नियुक्त करण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आहे.

नाशिक : महापालिकेत सत्तारूढ झालेल्या भाजपाने कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी प्रभाग समित्यांवरही प्रत्येकी २ सदस्य नियुक्त करण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आहे. त्यामुळे उपेक्षित कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन अ‍ॅक्टनुसार दोन सदस्य हे सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांमधून नेमण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन अ‍ॅक्ट कलम १९४९ चे कलम २९ अ मधील २ (क) नुसार एक सदस्य सामाजिक कार्यकर्त्यांमधून तर एक सदस्य एनजीओ संस्थेतून घेण्याची तरतूद आहे. सदर तरतूद ही ३० मे १९९५ पासून आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन अ‍ॅक्टमध्ये सदर तरतूद असतानाही महाराष्ट्रातील कोणत्याही महानगरपालिकेने कलम २९ अ मधील २ क नुसार सदस्यांची नेमणूक केलेली नाही. सदर सदस्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला दिशा देणे हाच या तरतुदीमागचा उद्देश आहे, परंतु त्याची दखल महापालिकेने घेतलेली नाही. दरवेळी प्रभाग समित्यांवर सदर दोन सदस्य नियुक्त करण्यासंबंधी चर्चा केली जाते, परंतु त्याबाबत अंमलबजावणी मात्र होत नाही. सत्ताधारी पक्षाकडूनही त्याबाबत फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. महापालिकेत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना सत्तापदांचा लाभ होणार आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी संधी मिळेल, अशी पदे नाहीत. त्यामुळेच कार्यकर्त्यांनाही स्थान मिळावे यासाठी भाजपाने सहाही प्रभाग समित्यांवर प्रत्येकी दोन सदस्य कार्यकर्त्यांमधून नियुक्त करण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित होणार असून तत्पूर्वी, त्यासाठी महासभेची मान्यता घेतली जाणार आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात प्रभाग समिती सभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)