राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:13 IST2020-06-15T13:12:53+5:302020-06-15T13:13:02+5:30

सिन्नर: राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य विभागात काम करणाºया कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी गुरुवार पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.

Work stoppage agitation of National Health Mission employees | राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

सिन्नर: राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य विभागात काम करणाºया कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी गुरुवार पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. शनिवारी या कर्मचाºयांनी पंचायत समिती आणि सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयासमोर बसून शासनाच्या विरोधात नारे लगावले. या आंदोलनात सिन्नर तालुक्यातील ६० कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे ऐन कोरोना साथीच्या काळात आरोग्य सेवेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.यावेळी तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष धनंजय पानसरे, सचिव सारीका गुजराथी, हिवताप संघटनेचे अशोक सानप, प्रभाकर धापसे, जि.प. आरोग्य कर्मचारी संघटनेचे सुनिल कोकाटे, प्रकाश जाधव, अभिजीत देशमुख, किरण सोनवणे, वंदना तळपे, पुनम गायकवाड, जयश्री चव्हाणके, मनिषा देवरे, लता तळपे, संगीता माळी, मेघा भोसले, मनिषा गवांदे, कल्याणी गोरे, सुनंदा पराड, पुष्पा रंदे, स्रेहल जाधव, मनिषा माळी यांच्यासह तालुक्यातील सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत काम करणारे कंत्राटी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Work stoppage agitation of National Health Mission employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक