शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दोन बालिकांसह महिलांच्या विनयभंगाची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:21 IST

शहर व परिसरात महिला, मुलींची छेडछाड सुरूच असून, शहरात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदशहरात विविध भागांत महिला, मुलींची छेडछाड सुरूच

नाशिक : शहर व परिसरात महिला, मुलींची छेडछाड सुरूच असून, शहरात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.शहरात निर्भया पथके कार्यान्वित करून महिला, मुलींची छेड काढण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहे. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पंचशीलनगरमध्ये राहत्या घराजवळ संशयित कुणाल रमेश तूपलोंढे याने येथील सार्वजनिक शौचालयाबाहेर एका अल्पवयीन बालिकेला अर्धनग्न अवस्थेत स्वत:च्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करत विनयभंग केल्याची तक्रार पीडित बालिकेच्या वडिलांनी दाखल केली आहे. याप्रकरणी संशयित कुणालविरुद्ध पोलिसांनी विनयभंग व ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल केला आहे.दुसरी घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील लायन्स क्लब उद्यानाजवळ घडली. संशयित दुचाकीचालक ऋषिकेश लांडगे (१९,रा.पांडूरंग रो-हाउस) याने फिर्यादी व तिची मावस बहीण आणि लहान बहीण दत्तमंदिर रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी लांडगे हा दुचाकीवरून आला आणि त्याने मावस बहिणीला कट मारला. यावेळी मावस बहीण रडू लागल्याने संशयित लांडगे याने तिच्या मावस बहिणीचा हात धरून भांडण करून अश्लील शिवीगाळ करू लागला यावेळी फिर्यादी बहिणीने लांडगे याच्या तावडीतून मावस बहिणीला सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने चापटीने मारहाण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. उपनगर पोलिसांनी संशयित लांडगे यास अटक केली आहे.तिसरी घटना शरणपूररोड येथील राका कॉलनीजवळ सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत घडली संशयित चिंतामणी, वारे मॅडम, मेहराज मॅडम, पुंड नावाची व्यक्ती व त्याचा अज्ञात सहकारी हे पाच ते सहा महिला पुरुष यांनी फिर्यादी पीडित महिलेच्या घरात बळजबरीने प्रवेश करून अश्लील वर्तन करत शिवीगाळ करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलांसोबत असलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाआहे.भर रस्त्यावर महिलेसोबत अश्लील वर्तनचौथी घटना पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत क्रांतिनगर परिसरात घडली. पीडित महिला ही आपल्या राहत्या घरासमोर पाणी मारत असताना संशयित अश्विन टिळे व त्याची पत्नी स्वाती टिळे यांनी महिलेसोबत कुरापत काढून अश्लील शिवीगाळ के ली. यावेळी अश्विन याने पीडित महिलेची ओढणी ओढून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य भर रस्त्यात करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. तसेच फिर्यादी यास त्याने शिवीगाळ करून ‘तू घरामध्ये वेश्या व्यवसाय चालविते’ असा आरोप केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी टिळे दाम्पत्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMolestationविनयभंग