शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

घोडेवाडी येथे महिलांची शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 17:56 IST

सर्वतिर्थ टाकेद : महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजने अंतर्गत कांदा पिकाची महिलांची शेतीशाळा वर्ग चार नुकतीच इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत टाकेद येथील घोडेवाडीत शेतकरी जगण घोडे यांच्या शेतावर संपन्न झाली. या महिलांच्या शेती शाळेला घोडेवाडीसह परिसरातील बहुसंख्य महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

ठळक मुद्देसेंद्रिय दशपर्णी अर्क बनविण्याचे कृषी विभागाकडून प्रशिक्षण

सर्वतिर्थ टाकेद : महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजने अंतर्गत कांदा पिकाची महिलांची शेतीशाळा वर्ग चार नुकतीच इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत टाकेद येथील घोडेवाडीत शेतकरी जगण घोडे यांच्या शेतावर संपन्न झाली. या महिलांच्या शेती शाळेला घोडेवाडीसह परिसरातील बहुसंख्य महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या.दरम्यान इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील ही पहिलीच शेतीशाळा उत्साहात संपन्न झाली. तालुक्यात दहा शेती शाळा घेण्यात येणार आहे. त्यापैकी टाकेद परिसरातील पहिलीच वैशिष्ट्यपूर्ण महत्वपूर्ण महिलांची शेतीशाळा घोडेवाडी येथे घेण्यात आली आहे.टाकेद विभागाच्या कृषी सहाय्यक जे. बी. गांगुर्डे यांच्या प्रयत्नाने ही आदीवासी शेतकरी महिलांची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. या शेतीशाळेत इगतपुरी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक के. एस. सोनवणे, अशोक राऊत, गांगुर्डे यांनी पाच महिला शेतकरी बचत गटातील २५ महिलांना कांदा शेती संदर्भात या शेतीशाळेत मार्गदर्शन केले.यामध्ये दशपर्णी अर्क बनविण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले. या शेतीशाळेत कृषी सहाय्यक सोनवणे यांनी कांदा खत व्यवस्थापनावर महिलांना मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक राऊत यांनी कीड व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. शेती शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी महिला स्वयंस्फूर्तीने परिसरातील उपलब्ध साधन सामुग्रीतून निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, लमीत बनविणे, बीजप्रक्रिया करणे याबाबत हिरहिरीने भाग घेऊन त्याचा उपयोग आपल्या शेतात करतांना दिसत आहे. महाराष्ट्र शासन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आयोजित महिलांची शेतीशाळा यामध्ये कांदा पिकावर पाच महिला बचत गटातील महिलांना या शेतीशाळेत कांदा पीक लागवडीपासून ते काढणी पर्यंत व कांदा पिकाचे व्यवस्थापण करणे संदर्भात कांदा पिकाच्या अवस्थेनुसार आठ वर्ग घेण्यात येणार आहे. त्यापैकी या शाळेत चार वर्ग घेण्यात आले.यामध्ये पिकातील एकात्मिक कीड व रोगावार नियंत्रण आणण्यासाठी दशपर्णी अर्क, जीवामृत, औषधी बनवणे, कांडा तसेच सेंद्रिय पद्धतीने घेण्यात येणाऱ्या पिकांवर मार्गदर्शन प्रात्यक्षिक घेण्यात आले.या शेती शाळेत महिलांचे सांघिक खेळ घेण्यात आले. तसेच सर्व महिला शेतकऱ्यांना शेती उपयोगी औषधें, खते वाटप करण्यात आली. इगतपुरी बी एल टी एम आत्मा नाशिक यांनी मार्गदर्शन केले. या महिलांच्या शेतीशाळा कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विलास खापरे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे होते यांनीही या प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. तालुका कृषीअधिकारी तंवर, मंडळ अधिकारी भास्कर गीते, पर्यवेक्षक किशोर भरते, पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

 

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती