Women felicitated at Takli Vinchur | टाकळी विंचूर येथे महिलांचा सत्कार

टाकळी विंचूर येथे महिलांचा सत्कार

ठळक मुद्देअध्यक्षस्थानी निफाड पंचायत समितीच्या सभापती रत्ना संगमनेरे

लासलगाव : महिला दिनाच्या निमित्ताने मातोश्री मीनाताई ठाकरे सोशल फाउंडेशन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने टाकळी विंचूर येथील आरोग्य अंगणवाडी, आशा कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निफाड पंचायत समितीच्या सभापती रत्ना संगमनेरे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून टाकळीच्या सरपंच अश्विनी जाधव, ग्रामपंचायत सदस्य ज्योती सुरासे, पूनम आमले, संगीता पाचोरकर, दीपाली लाड होत्या. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी डॉ. दामिनी रसाळ, करिष्मा कासार, गटप्रवर्तक दीपाली पवार, आशा कर्मचारी सविता चव्हाण, सीमा राजोळे, उज्ज्वला राजोळे, जयश्री निळे, अंगणवाडी सेविका मंगला येवले, पुंजाबाई राजळे, पुष्पा दरेकर शशिकला जाधव, रंजना काळे, अनुजा सुरासे आदींचा सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन दीपाली पवार यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निफाड पंचायत समितीचे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुरासे, शंकरराव संगमनेरे, अशोक आमले, रवींद्र पाचोरकर उपस्थित होते.

Web Title: Women felicitated at Takli Vinchur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.