शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा उताऱ्यावर आता महिलांची नोंदं

By admin | Updated: August 6, 2016 00:05 IST

कळवण : महिला सक्षमीकरण अभियान तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

 कळवण : शासनाच्या महसूल विभागामार्फत सप्ताहात महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. यंदा हे अभियान महिला सक्षमीकरण अभियान म्हणून राबविण्यात येणार असून, या कालावधीत महिलांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने कळवण तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली आहे.कळवण तलाठी कार्यालयात महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेतील महिला लाभार्थींना धनादेश देऊन करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष रंजना पगार, महिला व बालकल्याण सभापती रोहिणी महाले, नगरसेवक भाग्यश्री पगार, रंजना जगताप, अनिता जैन, अनिता महाजन, अनुराधा पगार आदिंसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, महसूलदिनी कळवण तलाठी कार्यालयात नगराध्यक्ष सुनीता पगार यांच्या हस्ते महिला सक्षमीकरण अभियानाचे उद्घाटन करण्यात येऊन महिला सप्ताहाचा उद्देश, महिला खातेदारांना त्यांच्या नावाचे ७/१२ चे नि:शुल्क वितरण तसेच महिलांच्या तयार वैयक्तिक लाभाचे वितरण, महिलांना दैनंदिन येणाऱ्या समस्यांसंदर्भात अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या.कळवणच्या उपनगराध्यक्ष रंजना पगार यांना त्यांच्या नावाने असलेला ७/१२ उतारा नि:शुल्क तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते यावेळी देण्यात आला. तसेच सातबारावर पुरु षांसोबत स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.तहसीलदार कैलास चावडे यांनी यावेळी अभियानसंदर्भात माहिती देताना सांगितले की, शासनाकडून प्राप्त निर्देशांनुसार १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत महाराजस्व अभियानात तालुक्यात महिला सक्षमीकरणाचे विविध उपक्र म राबविण्यात येणार आहेत. या कालावधीत गावपातळीवर महिला खातेदारांसाठी मेळावे आयोजित करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विविध उपक्र म हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी चावडे यांनी सांगितले.शासनाच्या सहकार, कृषी, महिला व बालकल्याण यांच्यामार्फत महिलांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती महिलांना देणे आणि त्यांचा या योजनांमध्ये सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत सातबारा उताऱ्यावर पुरु षांसोबत स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद करणे, वारस नोंदी करताना महिला वारसदारांची नावे वगळली गेली असल्यास नव्याने वारस नोंदवून महिलांचा समावेश करणे, महिला खातेदारांच्या वहिवाट किंवा पांधण रस्त्यांसंदर्भात असलेल्या तक्र ारी प्राधान्याने कार्यवाही करणे, महिला खातेदारांच्या ‘अधिकार अभिलेख’ विषयी प्राधान्याने कारवाई करणे, महिला जॉबकार्डधारकांना मेळावे घेऊन मार्गदर्शन करणे, शिधापित्रकेवर कुटुंबप्रमुख म्हणून महिलांची नोंद करणे, मतदार यादीत नाव न नोंदविलेल्या व १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींची नावे नोंदविण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, शाळा-महाविद्यालयांत मुलींना दाखले वितरण करणे, आधारवड योजनेअंतर्गत महिला लाभार्थींना (विधवा, अपंग, वृद्ध) अधिक समावेशासाठी विशेष मोहीम राबविणे, आधार नोंदणीकरिता महिलांसाठी विशेष मोहीम राबविणे असे उपक्र म राबविण्यात येणार असल्याची माहिती कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली.(वार्ताहर)