विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 21:35 IST2021-10-14T21:35:03+5:302021-10-14T21:35:28+5:30
नांदगाव : तालुक्यातील साकोरा येथील चांदोरा रोडवरील मढी शिवारातील रहिवासी अश्विनी संदीप बोरसे (३४) या विवाहितेचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळून आला.

विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह
ठळक मुद्देया घटनेमुळे साकोरा परिसरात एकच खळबळ उडाली
नांदगाव : तालुक्यातील साकोरा येथील चांदोरा रोडवरील मढी शिवारातील रहिवासी अश्विनी संदीप बोरसे (३४) या विवाहितेचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळून आला.
या घटनेमुळे साकोरा परिसरात एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्क केले जात आहेत. या महिलेच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा, असा परिवार आहे.
गुरुवारी (दि.१४) दुपारी घडलेल्या या घटनेची नांदगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून गु. र. न. ५८/२१ कलम १७४ प्रमाणे नोंद झाली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुराडकर हे करीत आहेत.