महिलेला बळजबरीने रिक्षात बसवून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:47 IST2019-01-03T16:44:55+5:302019-01-03T16:47:23+5:30

वडाळागाव घरकुल प्रकल्प परिसरात पिडीत महिला पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या रिक्षातील संशयित शाबीर जाबीर शेख याने या महिलेचा हात धरुन तिला रिक्षात ढकलण्याचा प्रयत्न केला.

The woman was forced to sit in a rickshaw and molest her | महिलेला बळजबरीने रिक्षात बसवून विनयभंग

महिलेला बळजबरीने रिक्षात बसवून विनयभंग

ठळक मुद्देसंशयित शेख यास विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक महिलेशी अश्लील भाषेत असभ्य वर्तन

इंदिरानगर : वडाळागाव मनप घरकुल प्रकल्पाजवळून शंभरफूटी रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेची छेड काढून रिक्षाचालकाने बळजबरीने तीला रिक्षामध्ये बसविण्याचा प्रयत्न केला तसेच मनात लज्जा उत्पन्न होईल अशापध्दतीने कृती करुन शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित रिक्षाचालकाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादिवरुन दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, वडाळागाव घरकुल प्रकल्प परिसरात पिडीत महिला पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या रिक्षातील संशयित शाबीर जाबीर शेख याने या महिलेचा हात धरुन तिला रिक्षात ढकलण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेशी अश्लील भाषेत असभ्य वर्तन करु लागला. महिलेने आरडाओरड केल्याने परिसरातील युवकांनी रिक्षाच्या दिशेने धाव घेत पिडित महिलेची मदत केली. यावेळी संशयित शेख हा घटनास्थळावरुन रिक्षा घेऊन फरार झाला. घटनेनंतर पिडि महिलेने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून संशयिताविरुध्द फिर्याद देत घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी फिर्यादीवरून संशयित शेख यास विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. पुढील तपास उपनिरिक्षक करोडवाल करीत आहेत.

Web Title: The woman was forced to sit in a rickshaw and molest her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.