बाटलीच्या काचेने गळा चिरून महिलेचा खून; अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:28 IST2025-01-21T12:26:55+5:302025-01-21T12:28:58+5:30

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर मृतदेह सिंधूबाई वाजे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

Woman murdered by slitting throat with bottle glass Body found half naked | बाटलीच्या काचेने गळा चिरून महिलेचा खून; अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

बाटलीच्या काचेने गळा चिरून महिलेचा खून; अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

Sinnar Murder: सिन्नर तालुक्यातील डुबेरे-सोनारी रोडवर भैरवनाथ मंदिराजवळच्या एका शेतात ५५ वर्षीय महिलेचा दारूच्या बाटलीच्या काचेने गळा चिरून खून झाल्याची घटना सोमवारी (दि.२०) सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. वाजे वस्तीवरील सिंधूबाई मारुती वाजे (५५) असे मृत महिलेचे नाव आहे. 

भैरवनाथ मंदिराजवळ वारुंगसे यांची शेती आहे. सकाळी बांधाच्या कडेलाच अर्धनग्न अवस्थेत गळा चिरलेल्या महिलेचा मृतदेह शेतकऱ्यांना आढळून आला. त्यानंतर पोलिसपाटील रामदास वारुंगसे यांना घटनेची माहिती देण्यात आली. पाटील यांनी घटनास्थळी जात खातरजमा करून खुनाची माहिती सिन्नर पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. 

दरम्यान, मृतदेहाची पाहणी केल्यानंतर मृतदेह सिंधूबाई वाजे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Woman murdered by slitting throat with bottle glass Body found half naked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.