जीप-दुचाकी अपघातात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:04 IST2021-04-06T22:29:27+5:302021-04-07T01:04:59+5:30
ननाशी : ननाशी - दिंडोरी रस्त्यावरील वनारे फाट्यानजीक क्रूझर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला ठार झाली .

जीप-दुचाकी अपघातात महिला ठार
ननाशी : ननाशी - दिंडोरी रस्त्यावरील वनारे फाट्यानजीक क्रूझर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला ठार झाली.
पिंपळगाव बसवंत येथील मूळ राहणारे आणि सध्या खडकजांब (ता. चांदवड). येथे कामाला असलेले विशाल रमेश पीठे व सुमन छगन गायकवाड हे लग्नानिमित्त आंबाड (ता.दिंडोरी) येथे आले होते. लग्न समारंभ आटोपून ते दोघे दुचाकीने (एम एच०५ ए. ई. २५६१) खडकजांबकडे परतत असतांना वनारे फाट्यानजीक एका वळणावर समोरून येणारी क्रूझर जीप (एम. एच. १५ सी एम. ८५६०) व दुचाकी यांच्यात धडक झाली.
या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या सुमन गायकवाड (६०) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक विशाल पिठे यांच्याही पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर ननाशी आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तसेच सदर महिलेला ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्या मृत झाल्याचे घोषित केले.