घराला लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू; मुलगा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:53 IST2018-12-17T00:53:22+5:302018-12-17T00:53:48+5:30
सिडकोतील घराला लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजलेल्या मायलेकापैकी आईचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१६) पहाटेच्या सुमारास घडली़ लता कन्हैय्या परदेशी (४०, रा़ उत्तमनगर, सिडको) असे मृत्यू महिलेचे नाव आहे़

घराला लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू; मुलगा गंभीर
नाशिक : सिडकोतील घराला लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजलेल्या मायलेकापैकी आईचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१६) पहाटेच्या सुमारास घडली़ लता कन्हैय्या परदेशी (४०, रा़ उत्तमनगर, सिडको) असे मृत्यू महिलेचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उत्तमनगरमधील कन्हैय्या परदेशी यांच्या घरास आग लागली़ यामध्ये त्यांची पत्नी लता परदेशी (४०) ही नव्वद टक्के, तर मुलगा वृषभ (२०) हा ७० टक्के भाजला़ या दोघांनाही शेजारी राहणारे संजय बागडे यांनी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्षात उपचारासाठी दाखल केले होते़ यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या लता परदेशी यांचा सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर गंभीर भाजलेल्या वृषभवर उपचार सुरू आहेत़दरम्यान, या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़