चारचाकी वाहनाच्या धडकेत महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:07 IST2019-07-09T22:07:34+5:302019-07-09T22:07:53+5:30
मालेगाव : मुंबई- आग्रा महामार्गावर मुंगसे शिवारात चारचाकी वाहनाने अॅपेरिक्षाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३० वर्षीय महिला ठार झाली

चारचाकी वाहनाच्या धडकेत महिला ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मुंबई- आग्रा महामार्गावर मुंगसे शिवारात चारचाकी वाहनाने अॅपेरिक्षाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३० वर्षीय महिला जखमी ठार झाली. इतर प्रवाशीही जखमी झाले आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना अशोक पानपाटील यांनी फिर्याद दिली आहे.
चारचाकी वाहनावरील (क्र. एमएच ४१ एएल ८६००) चालक (नाव माहीत नाही) याने अॅपेरिक्षाला (क्र. एमएच४१ जी ७८६९) मागून जोरदार धडक दिली. या धडकेत सुरेखा भदाणे (३०) या गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्या. अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार खैरनार हे करीत आहेत.