वीज अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 23:12 IST2022-06-08T23:12:33+5:302022-06-08T23:12:33+5:30

सिन्नर:तालुक्यातील पूर्व भागातील दुसंगवाडी येथे वीज अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. उज्ज्वला प्रदिप ढमाले (32) असे मृत महिलेचे नाव आहे.

Woman dies after being struck by lightning | वीज अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू

वीज अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देशवविच्छेदनासाठी मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणला होता.

सिन्नर:तालुक्यातील पूर्व भागातील दुसंगवाडी येथे वीज अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. उज्ज्वला प्रदिप ढमाले (32) असे मृत महिलेचे नाव आहे.
दुसंगवाडी शिवारात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात प्रचंड बदल झाला. ढगाळ वातावरणानंतर वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. ढमाले परिवार शेतात वस्ती करून राहतात. उज्ज्वला ढमाले या शेतातील काम आवरून घराकडे परतत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यानंतर ढमाले कुटुंबियांनी उज्ज्वला यांना उपचारासाठी वावी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासून मृत घोषीत केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणला होता.

Web Title: Woman dies after being struck by lightning