अशोकामार्गावर महिलेची पोत खेचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 18:13 IST2018-09-17T18:11:17+5:302018-09-17T18:13:16+5:30
नाशिक : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना रविवारी (दि़१६) रात्री अशोकामार्गावरील आदित्यनगरच्या कॉलनी रोडवर घडली़

अशोकामार्गावर महिलेची पोत खेचली
नाशिक : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना रविवारी (दि़१६) रात्री अशोकामार्गावरील आदित्यनगरच्या कॉलनी रोडवर घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सद््गुरू अपार्टमेंटमधील रहिवासी छाया प्रकाश कोतले या रात्री आठ वाजेच्या सुमारास अशोकामार्गाकडे कॉलनीरोडने पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाचे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचले व फरार झाला़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहस्थनगरला घरफोडी
नाशिक : बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये घडली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ व १६ सप्टेंबर रोजी चोरट्यांनी सिंहस्थनगरमधील रहिवासी अक्षय खैरनार यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील कपाटातून २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, सात हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे ओम पान व दहा हजार रुपयांची रोकड असा ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइलची चोरी
नाशिक : पेठरोडवरील हवामान खात्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याचा मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश नागपुरे हे हवामान खात्याच्या कार्यालयातील कर्मचारी असून, रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कार्यालयाच्या टेरेसच्या दरवाजातून प्रवेश करून टेबलवर ठेवलेला महागडा मोबाइल चोरून नेला़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.