'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:34 IST2025-10-14T19:32:58+5:302025-10-14T19:34:41+5:30
Nashik Kumbh Mela 2027: नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये वैदिक विधीसाठी पुरोहित उपलब्ध व्हावेत म्हणून तेथील आयटीआयमध्ये अभ्यासक्रम सुरू केला जात आहे.

'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
नाशिक : सरकारतर्फे 'अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पहिल्यांदाच वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट हा नवा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. पुढील वर्षी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये वैदिक विधीसाठी पुरोहित उपलब्ध व्हावेत म्हणून तेथील आयटीआयमध्ये अभ्यासक्रम सुरू केला जात आहे.
अभ्यासक्रमासाठी इच्छुकांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेत अर्जाची छाननी आणि मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
सिंहस्थात पुरोहितांच्या उपलब्धतेसाठी कोर्स
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पहिल्यांदाच वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. पुढील वर्षी नाशिकमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये वैदिव विधीसाठी पुरोहित उपलब्ध व्हावेत म्हणून तेथील आयटीआयमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. यास चांगला प्रतिसाद मिळण्याच अपेक्षा आहे.
वैदिक संस्कार, मंत्रोच्चाराचे मिळणार धडे
नाशिकमध्ये होणाऱ्या २०२६ च्या कुंभमेळ्यासाठी प्रशिक्षित पुजारी तयार करण्यासाठी विशेष अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार आणि मंत्रोच्चाराचे प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे कुंभमेळ्यात योग्य प्रशिक्षण घेतलेले पुजारी उपलब्ध होतील.
आधुनिक तंत्रशिक्षण
आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रशिक्षणासोबत वैदिक मंत्रांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश तांत्रिक कौशल्यासोबत आध्यात्मिक ज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. हा अभ्यासक्रम पहिल्यांदाच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राबविला जाणार आहे.
इतरही शेकडो नवे अभ्यासक्रम सुरू!
राज्यभरात कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता वाढवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सौरऊर्जा, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, कृत्रिम प्रज्ञा, ग्रीन हायड्रोजन, मोबाइल दुरुस्ती आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व इतरही शेकडो नवे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.