नाशिक - सिंहस्थासाठी शहरात सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी दिले. शनिवारी राजेशकुमार यांनी रामकुंडसह विविध स्थळांना भेट देत पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव राजेशकुमार नाशिक येथे आले होते. दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी द्वारका परिसर, अमृत स्नान पर्वणी मार्ग, रामकुंड, श्री काळाराम मंदिर, सीता गुंफा, स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष, आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार (विशेष), विभागीय आयुक्त तथा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकाल पथ, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष, आदींसह विविध विकासकामांची माहिती दिली.
Web Summary : Chief Secretary Rajesh Kumar directed officials to expedite Kumbh Mela preparations in Nashik and Trimbakeshwar. He reviewed ongoing works, visiting Ramkund and other key sites. Senior officials were present during the inspection, discussing progress and future plans for the 2027 event.
Web Summary : मुख्य सचिव राजेश कुमार ने नाशिक और त्र्यंबकेश्वर में कुंभ मेले की तैयारियों में तेजी लाने के निर्देश दिए। उन्होंने रामकुंड और अन्य महत्वपूर्ण स्थलों का दौरा कर चल रहे कार्यों की समीक्षा की। निरीक्षण के दौरान वरिष्ठ अधिकारी मौजूद थे, जिन्होंने 2027 के आयोजन के लिए प्रगति और भविष्य की योजनाओं पर चर्चा की।